इचलकरंजी / प्रतिनिधी :
इचलकरंजी शहर युवक काँग्रेस अध्यक्षपदाच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेवून काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्याबरोबरच जनतेचे मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे नूतन अध्यक्ष प्रमोद खुडे यांनी निवडीबद्दल आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलताना सांगितले.
इचलकरंजी शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बाळासाहेब खुडे यांनी मराठा क्रांती सेनेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विकासाबरोबरच समाजोपयोगी उपक्रम राबवण्यावर सातत्याने भर दिला आहे. याशिवाय युवकांना संघटीत करुन त्या संघटीत ताकदीचा उपयोग युवकांना उद्योग - व्यवसाय सुरु करण्यासाठी केला आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार मिळून यातून
समाजविकासात मोठे योगदान मिळत आहे.या भरीव सामाजिक कार्याची दखल घेवूनच प्रमोद खुडे यांची इचलकरंजी शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.सदर निवडीचे पत्र त्यांना ग्रुह राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. या निवडीसाठी त्यांना पालकमंत्री सतेज पाटील ,काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर , कोल्हापूर जिल्हा युवक
काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन बागे ,शहराध्यक्ष संजय कांबळे ,संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे शहराध्यक्ष राहुल खंजिरे यांचे अनमोल सहकार्य लाभले.या निवडीबद्दल त्यांचा सत्कार विविध संस्था व संघटनांच्या वतीने सत्कार त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रमोद खुडे यांनी युवक काँग्रेस शहराध्यक्ष पदाच्या माध्यमातून सर्वाना सोबत घेवून जनतेचे मुलभूत प्रश्न सोडवण्याबरोबरच गोरगरीब -गरजूंना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्तेबाळासाहेब खुडे,पत्रकार सुभाष भस्मे ,बाळासाहेब बागवान ,किरण पोवार ,बाळासाहेब सूर्यवंशी ,अरुण मस्कर ,जोतीराम बरगे यांच्यासह विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी ,सदस्य उपस्थित होते.
दरम्यान ,या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.