प्रशासक तथा मुख्यअधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल.
मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नगरपरिषदे मार्फत स्वच्छता विषयक विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी शहरातील स्वच्छतेची पाहणी करण्याचा प्रारंभ केला. आज आज दि.४ जानेवारी रोजी शहरातील वॉर्ड क्रमांक १,२,३,४ व ५ या वार्ड मध्ये फिरती करून पाहणी केली. तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या सोबत स्वच्छतेविषयी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले. प्रत्येक वॉर्ड मधील कर्मचाऱ्यांची हजेरी तपासून संबंधित मुकादम यांना स्वच्छतेबाबत सक्त सूचना दिल्या. याच बरोबर महासत्ता चौक आणि विकली मार्केट येथील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना संबंधितांना केल्या.
आजच्या पाहणी दरम्यान शहरामध्ये विविध ठिकाणी नागरिकांनी कचरा रस्त्यावर तसेच चौकाच्या ठिकाणी टाकल्यामुळे त्या ठिकाणी कचरा कोंडाळा तयार झाल्याचे मुख्य अधिकारी यांच्या निदर्शनास आलेने संपूर्ण शहरातील अशी कचरा कोंडाळ्याची ठिकाणे आरोग्य विभागामार्फत शोधून ती जागा पूर्णपणे स्वच्छ करून त्या ठिकाणी परिसरातील नागरिकांना कचरा टाकण्यास प्रतिबंध करून त्या जागेचे सुशोभीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागास दिल्या.
या पुढेही संपूर्ण शहरात याच प्रकारे अचानक भेट देऊन स्वच्छतेची पाहणी करण्यात येणार असून नागरिकांनी आपल्या घरातील ओला/ सुका कचरा आपल्या घराजवळ येणाऱ्या घंटागाडी मध्येच टाकावा असे आवाहन प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी केले आणि शहरातील जे नागरिक आपल्या घरातील कचरा रस्त्यावर, गटारीत अथवा इतरत्र कोठेही टाकतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला.
आजचा या पाहणी वेळी शहर स्वच्छता विभाग प्रमुख विश्वास हेगडे, स्वच्छता निरीक्षक विजय पाटील , सर्जेराव पाटील संपत चव्हाण आदी उपस्थित होते.