प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मराठा आरक्षणसह सारथी संस्थेच्या कामकाज ठप्प, कै.आण्णासो पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या कर्ज विलंब, मागासवर्गीय आयोगातर्फे मराठ्यांचे सर्वेक्षण इ. सर्व प्रश्री शासनाची दिरंगाई पहाता मराठ्यांनी पुन्हा एल्गार करण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन मराठा महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी हूपरी मराठा मंडळाच्या बैठकीत केले.
या बैठकीत हूपरी पंचक्रोशीतून रणशिंग फुंकण्याचे एकमुखाने ठरले. अध्यक्षपदी जेष्ठ मार्गदर्शक दिनकरराव ससे होते. हूपरी मराठा मंडळ अध्यक्ष मोहनराव वाईंगडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील, उपाध्यक्ष बाळासो रणदिवे, उपनगराध्यक्ष गणेश वाईंगडे, युवक अध्यक्ष मालवेकर, विद्यार्थी अध्यक्ष संताजी देसाई, प्रतापसिंह देसाई,अरुण यादव सर,सचिव पृथ्वीराज गायकवाड,इ.मनोगत व्यक्त केली. तसेच मराठा नगरसेवक व समाजातील जेष्ठ व तरूण बहुसंख्येने उपस्थित होते.