कडक कारवायी करण्याचे मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले.
प्रेस मीडिया ऑनलाइन :
बेडकिहाळ, ता, ३१, येथील समस्त बौद्ध समाज वतीने रायचूर जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांनी प्रजासत्ताक दिनी रायचूर जिल्हा न्यायालय परिसरात ध्वजारोहना प्रसंगी भारत रत्न , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हटविल्या नंतरच ध्वजारोहण करेन असा आग्रह केला. त्यांच्या या वक्तव्या मुळे, संपूर्ण राज्यात निषेध व्यक्त करून या न्यायाधीशावर कायदेशीर कडक कार्यवाही करण्याची मागणी संपूर्ण राज्यात होता आहे. तर याच पार्शवभूमीवर बेडकिहाळ येथील समस्त बौद्द समाज वतीने न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांचावर कडक कार्यवाई करण्याची मागणी सोमवार (ता ३१) रोजी निवेदनाद्वारे करण्यात आले.
सकाळी १०;३० च्या सुमारे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात समस्त बौद्ध समाज बांधव व महिला एकत्रित जमून न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांची प्रेत यात्रा काढली, या वेळी गौडा यांच्या वक्तव्या समंधी निषेध पर घोषणा देत वाल्मिकी नगर, दसरा चौक, बाजार पेठ, शिवाजी चौक, जुना बस्थानक मार्गे बेडकिहाळ सर्कल पर्यंत नेषध मोर्चा काढण्यात आले. या वेळी सर्कल मध्ये बौद्ध समाजातील महिला व कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करून तीव्र निषेध व्यक्त केले.
या वेळी ग्राम पंचायत उपाध्यक्षा जयश्री जाधव, सदस्य जीवन यादव, विक्रम शिंगाडे, ऍड तम्मन्नवर, विध्याधर चितळे, ज्ञान ज्योती सावित्रीबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा दीपा जाधव, आदींनी निषेध पर मनोगत व्यक्त करून बेडकीहाळचे महसुल उप निरीक्षक एस एन नेमन्नावर यांच्या मार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले. या वेळी न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केले. या वेळी ग्राम पंचायत सदस्य, सदस्या यांच्या सह बौद्ध समाजातील महिला,युवक मंडळाचे सदस्य, कार्यकर्ते, पदाधिकारी, व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी बिट हवालदार एस एस देवर उपस्तीत होते.
बेडकिहाळ, महसूल उप निरीक्षक एस एन नेम्मन्नवर याना निवेदन देत असताना जयश्री जाधव, दीपा जाधव, जिवन यादव, विक्रम शिंगाडे, गंगाधर सुर्यवंशी, मनोज जाधव,व इतर कार्यकर्ते,