सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभार..
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
आकिवाट : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारा मुळे आकिवाट माजरेवाडी रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहेत- त्यामुळे प्रवासी वर्गातून संतापाची लाट पसरली आहे रस्त्याच्या कडेला मार्गदर्शक बोर्ड लावावेत व रस्त्याची रुंदी वाढवावे अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे आज दुपारी रस्त्यावर धावणारी मोटारगाडी अचानक खड्यात गेल्याने झालेल्या अपघातात दोन मुली एक महिला जखमी झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आकिवाट रस्त्यावर विशाल आवतींच्या शेताजवळ आज दुपारी फोरव्हीलर गाडी न एम एच १२ एम इ 6884 हि गाडी खिद्रापूरहून कोपेश्वरचे दर्शन घेऊन आकिवाट मार्गे कुरुंदवाड कडे जातं असताना गाडी अचानक खड्यात जाऊन पडली गाडीतील महिलांनी आरडाओरडा करताच नागरिक धावत पळत जाऊन गाडीत असलेल्या दोन मुली आणि एक महिलेस बाहेर काढले दोन मुलीस दुखापत झाली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही .सार्वजनिक बांधकाम विभागाने वळणावर मार्गदर्शक फलक लावलेला नाही अरुंद रस्त्यावरन गुरूंदत्त शुगरकडे जाणाऱ्या बैलगाड्या ट्रॅक्टर ट्रेलर मोटोर साईकलची वर्दळ वाढली आहे अरुंद रस्त्यामुळे अपघातचे प्रमाण वाढले आहे याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ घेऊन रस्त्याची रुंदी वाढवावी व गुरुदत्तचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी या कामात लक्ष घालून याचा पाठपुरावा करावा अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे
वेळ आली होती पण काळ आला नव्हता...
अपघातग्रस्तांना बाहेर काढल्यानंतर लगेचच अपघात ठिकाणाहून काळा नागसर्फ बाहेर पडल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली . कोणास ईजा न करता नागराज निघून गेले. या वेळी खरोखरच काळ आला होता पण वेळ आली नव्हती . असेच म्हणावे लागत आहे
विश्वास कांबळे संपादक :
साप्ताहिक दलीतमित्र आकिवाट
मो न 9699610073