वंचित आघाडीचे माजी जिल्हा अध्यक्ष नानासाहेब पारडे यांचे प्रतिपादन..
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी.. आनंदा शिंदे.
संत गाडगे महाराज चॉरिटेबल संस्था ट्रस्ट चा वतीने गाडगे महाराज ६५ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.कार्यक्रमा चे अध्यक्ष श्री बंडा देऊ परिट होते . प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजी नगरपालिका पाणी पुरवठा सभापती श्री दिपक सुर्वे तसेच नगरसेवक राजू बोंद्रे आरपी आयचे बाळासाहेब कांबळे होते.बाबाच्या फोटो पूजन दिपक सुर्वे यांचे शुभ हस्ते करण्यात आले..
कार्यक्रमाच्या ठिकाणी वंचित आघाडीचे माजी जिल्हा अध्यक्ष श्री नानासाहेब पारडे आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले की.डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि संत गाडगे महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विचार समाजातील तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले पाहिजे तरच आपण संत गाडगे महाराजचा विचारराने घेतलेल्या सामाजीक चळवळ खऱ्या अर्थाने सार्थ होईल तसेच पुढे नेण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांची फार मोठी जबाबदारी आहे.
आणि म्हणूनच परिट समाजाचे जिल्हा अध्यक्ष यांनी संत गाडगे महाराज चॉरिटेबल ट्रस्टच्या वतीने अनेक थोर महापुरुष चा विचाराने अनेक सामाजिक कार्यक्रम या इचलकरंजी शहरात सतत राबविण्यात येत असतात आजही पुण्यतिथी चा कार्यक्रम व पुण्यतिथी औचित्य साधून
दुपारी ठीक ४ वाजता इंदिरा गांधी हॉस्पिटल ( आय जी एम हॉस्पिटल) मघील म्हणून महिला पुरुष पेशंटना इचलकरंजी नगरपालिका चे नगरसेवक श्री राजू बोंद्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले या कार्यक्रमास महिला जिल्हाध्यक्ष नयना पोलादे रुपाली परिट शामबाला शिंदे गणेश शिंदे सूभाष परिट प्रकाश शिंदे संगम शिंदे राजू शिंदे राकेश परिट दिलीप शिंदे रोहित शिंदे आणि संचालक मंडळ महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते