स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले ..
सुमारे 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - विनापरवाना बेकायदा घातक शस्त्रे जवळ बाळगून विक्री करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पियुष पाटील असे त्याचे नाव असून त्याच्याकडून सहा तलवारी आणि एक दुचाकी असा सुमारे 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील पियुष रायगोंडा पाटील हा बेकायदेशीर शस्त्र विकत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवारी रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखा इचलकंजी येथील पथकाने कारवाई करत कुंभोज हातकणंगले रस्त्यावरील बजरंग बियर बार जवळ पियुष रायगोंडा पाटील याला ताब्यात घेतले. पियुष याच्याकडून बेकायदा विक्रीसाठी आणलेल्या सहा तलवारी आणि दुचाकी असा सुमारे 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले राजीव शिंदे फिरोज बेग, आयुब गडकरी, सूरज चव्हाण यांनी ही कारवाई केली.
Tags
कोल्हापूर