ओमायक्रोन सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात

 पुण्यात नवीन नियमावली घोषित 

प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

अनवरअली शेख :

पुणे दि २७ : भारतातील महाराष्ट्रात ओमायक्रोनचे सर्वाधिक रुग्ण सापडल्याने  चिंता आणखी वाढली आहे.क्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर    राज्य शासनाकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संपुर्ण जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले असून त्याअंतर्गत पाच पेक्षा अधिक व्यक्तींना रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत एकत्र येण्यास परवानगी नाही,  

याच पार्श्वभूमीवर पुण्याच्या जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या सूचनेप्रमाणे  पुण्यातही नवी नियमावली घोषित करण्यात आली आहे. 

*रेस्टॉरंट, फिल्म, सिनेमा आणि नाट्यगृहांसाठी केवळ ५०%  उपस्थितीची मर्यादा*

*क्रीडा स्पर्धा किंवा इतर स्पर्धांचे आयोजन केल्यास प्रेक्षक क्षमतेच्या केवळ २५%  उपस्थितीला परवानगी*

*बंद जागेत विवाह सोहळा आयोजित होणार असेल तर त्यासाठी केवळ १०० जणांच्या उपस्थितीची मर्यादा*

*मोकळ्या जागेतील विवाहसोहळ्यास जास्तीत जास्त २५० आणि जागेच्या क्षमतेनुसार केवळ २५% उपस्थितीची परवानगी*

*सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम बंदीस्त जागेत आयोजित केल्यास केवळ १०० जणांना, तर मोकळ्या जागेत २५० जणांना परवानगी*


प्रेस मीडिया साठी  : 

 जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क

 पुणे जिल्हा प्रतिनिधी 9975071717

Post a Comment

Previous Post Next Post