सोमवारी गझलसंग्रह प्रकाशन व गायन मैफल




प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

इचलकरंजी ता.२३ , ख्यातनाम उर्दू शायर मिर्झा गालिब यांच्या २२५ व्या जन्मवर्षं प्रारंभदिनी "जिनियस ऑफ गालिब ग्रुप ' च्या वतीने ज्येष्ठ गझलकार प्रसाद कुलकर्णी आणि गझलनंदा उर्फ प्रा.सुनंदा पाटील यांच्या 'गझल प्रेमऋतूची ' या गझल संग्रहाचे प्रकाशन आणि गझल गायन मैफल आयोजित केली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ.प्रदीप ठेंगल (मुख्याधिकारी इनपा.) हे भूषवणार आहेत.प्रमुख पाहुणे डॉ. एम.ए.बोरगावे (एमडी. नामवंत फिजिशियन ) आणि शब्बीर सोलापुरे( पार्श्वगायक व संगीतकार ) हे आहेत.तर गझलांचे गायन सौ. गौरी लक्ष्‍मण पाटील ( प्रसिद्ध गायिका व अभिनेत्री ), सागर बेलगामी, बेळगाव ( नामवंत शायर व गायक ),सौ.वृषाली संजय कुलकर्णी ,पुणे,( प्रसिद्ध शास्त्रीय व सुगम संगीत गायिका )आणि डॉ.प्रसाद यदुराज (प्रा. जे जे मगदूम कॉलेज जयसिंगपूर)

हे करणार आहेत. हा कार्यक्रम सोमवार ता. २७ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता रोटरी क्लब सभागृह,दाते मळा, इचलकरंजी येथे होणार आहे.तरी या कार्यक्रमास इचलकरंजी व परिसरातील रसिकमंडळींनी यावे असे आवाहन जिनियस ऑफ गालिब ग्रुप ,इचलकरंजीच्या वतीने संतोष साधले व इरफान शाहनूरी यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post