शासनाने वाहतुकीच्या नियमाचे नियमभंग बाबतचे दंड व तडजोड फी यामध्ये केलेल्या वाढीच्या विरोधात

 पुणे मालक व प्रवासी वाहतूक कृती समितीचे पुण्यातील विधान भवन येथे आंदोलन होणार

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

जिलाणी (मुन्ना ) शेख :

पुणे : शासनाने वाहतुकीच्या नियमाचे नियमभंग बाबतचे दंड व तडजोड फी यामध्ये केलेल्या वाढीच्या विरोधात पुणे मालक व प्रवासी वाहतूक कृती समितीचे पुण्यातील विधान भवन येथे आंदोलन होणार आहे. आंदोलनाला गुरुवारी (दि. 23) मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्यच्या वतीने पाठिंबा देण्यात येणार आहे.

मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजू घाटोळे, कार्याध्यक्ष विलास आपटे, सुनिता चौहान, महासचिव यशवंत कुंभार, वरिष्ठ उपाध्यक्ष अनंत कुंभार, प्रवक्ता विवेक खाडे, खजिनदार निलेश गांगुर्डे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

नवीन सुधारित वाहतूक अधिनियम 2019 नुसार डिसेंबर 2021 पासून वाहतुकीच्या नियमाचे नियमभंग बाबतचे दंड व तडजोड फी यामध्ये प्रचंड व अन्यायकारक वाढ केली असल्याचे मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांचे व मालक व प्रवासी वाहतूक कृती समितीचे मत आहे. हा अधिनियम सरकारने त्वरित मागे घ्यावा व अन्यायकारक भाववाढ रद्द करावे यासाठी व मालक व प्रवासी वाहतूक कृती समिती पुणे यांना संपूर्णपणे पाठिंबा व्यक्त करण्यासाठी सर्व ड्रायव्हिंग स्कूल संचालकांना विधान भवन पुणे जाहीर मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे सदर मोर्च्यात सहभागी होऊन सर्व सरकारमान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी आपला या मागणीसाठी पाठींबा व्यक्त करावा

केंद्र व राज्य सरकारने दंड व तडजोड फी शुल्कामध्ये भरमसाठ वाढ केलेली आहे उत्कृष्ट रस्ते उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर उत्कृष्ट सोय त्याच बरोबर रोड मार्किंग राउंड अबाउट झेब्रा क्रॉसिंग सर्विस रोड हे सर्व उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची असताना याबाबत सरकार उदासीन आहे. ट्राफिक सिग्नल, स्टॉप लाईन, झेब्रा क्रॉसिंग वाहन चालकांना ठळक दिसतील अशा प्रमाणे रंगवली पाहिजेत. पण असे होताना दिसून येत नाही.

2021 ते 2030 या दशकामध्ये उत्कृष्ट रस्ते जखमींना तातडीची वैद्यकीय मदत अपघात ग्रस्तांना तात्काळ हॉस्पिटल उपचार सुविधा उपलब्ध करून देणे शक्य झाले तरच आपण देशभरातील रस्ते अपघात 50 टक्के कमी करण्याचे लक्ष्य गाठू शकतो. वरील प्रमाणे कुठल्याही सुविधा उपलब्ध नसताना वाहन चालकांकडून भरमसाठ फी भरमसाठ दंड भरमसाठ तडजोड शुल्क भरायला लावायचे हे अव्यवहार्य आहे.

मोटार वाहन अधिनियम 2019 प्रमाणे वाढवलेले सर्व दंड तडजोड फी या अधिनियमाचा सरकारने पुनर्विचार करावा व वाहनचालकांना सुरक्षित रस्ते, सुरक्षित प्रवास, अपघात विरहित रस्ते उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. हा जाचक अधिनियम त्वरित मागे घ्यावा अशी मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post