प्रेस मीडिया वृत्तसेवा : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी ५ जानेवारील मतदान होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी.एन. पाटील, आमदार राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वायपाटील यांची बिनविरोध निवड झाली; परंतू शिवसेनेला महाविकास आघाडीत समाधानकारक जागा न मिळाल्याने स्वतंत्र्य पॅनेल उभे केले आहे.
यामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या मातेश्री निवेदिता माने यांनी सत्तारुढ गटाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर यांनी पत्रकार परिषद घेत आपण जिल्हा बँकेसाठी पॅनेल उभारणार असल्याचे स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेस जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेने अजून तिसर्या जागेची मागणी केल्यानंतर स्वीकृत संचालक देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी आघाडीने दिला. शासकीय विश्रामगृह येथे तब्बल सहा तास चर्चेच्या फेर्या होऊनही वाटाघाटी फिस्कटल्या. रात्री नऊ वाजता शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर केले.
उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे :
गट प्रक्रियेतून संजय मंडलिक आणि बाबासाहेब पाटील
नागरी बँक आणि पतसंस्था गटातून आमदार प्रकाश अबिटकर यांचे बंधू अर्जून अबिटकर हे रिंगणात उतरले आहेत.
महिला गटातून : लतिका शिंदे आणि रेखा कुऱ्हाडे यांनी उमेदवारी
अनुसुचित जाती जमाती गटातून : उत्तम कांबळे
विमुक्त जाती जमाती : विश्वास जाधव
इतर मागासवर्गीय गटातून : रविंद्र बाजीराव मडके हे उमेदवार शिवसेनेकडून रिंगणात उतरणार आहेत, अशी माहिती अरूण दुधवडकर यांनी दिली.
आज (दि.२१) मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत अजून तिसरी जागा द्यावी; अन्यथा पॅनेलची घोषणा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.