तिनेच केली तहसीलदाराचे माती 25 हजारांची लाच घेताना रंगेहात जाळ्यात

चंद्रपूर महसूल विभागात जोरदार खळबळ उडाली आहे

प्रेस मीडिया वृत्तसेवा : सुनिल पाटील :

चंद्रपूर जिल्ह्यात लाच स्वीकारताना तहसीलदारास रंगेहाथ पकडून  अटक करण्यात आली असून डॉक्टर निलेश खटके असे अटक केलेल्या तहसीलदाराचे नाव आहे चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली .


विठभट्टी साठी लागणारी लाल माती उत्खननची परवानगी साठी 25 हजारांची लाच मागितली होती. दरम्यान या घटनेने जिल्ह्यात जोरदार खळबळ उडाली आहे.

भद्रावती येथिल अर्जदाराची विटाभट्टी आहे.विटाभट्टीसाठी लाल माती गरजेची होती.लाल मातीचा उत्खननासाठी अर्जदाराने रितसर परवानगी मिळण्यासाठी तहसिल कार्यालयात अर्ज दाखल केला.मात्र तहसिलदार डॉ.निलेशा खटके यांनी परवानगी हवी असेल तर 25 हजार रूपये द्यावे लागतील अशी अट ठेवली.मात्र अर्जदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नव्हती.त्याने थेट चंद्रपूर येथिल लाचलुचपत विभागाचे कार्यालयच गाठले. लाचलुचपत विभागाने सापळा रचून भद्रावती तहसिल कार्यालयात छापा टाकला. यावेळी तहसिलदार डॉ. निलेश खटके यांना लाच स्विकारताना रंगेहात पकडले.या कार्यवाहीने चंद्रपूर महसूल विभागात जोरदार खळबळ उडाली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post