पुरंदरेच्या अस्थी महाराजांच्या चरणी ठेवण्याचा प्रयत्न

 



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :सुनील पाटील

स्वर्गीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरच्या अस्थि महाराजांच्या चरणी ठेवण्याचा प्लॅन बुधवारी दुपारी किल्ले रायगडावरील शिव समाधी समोर आज सदृश्य पावडर आणि पुस्तक पूजन करण्यावरून वाद झाला मराठा सेवक समितीच्या पुण्यातील कार्यकर्त्या पूजा झोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सदरची घटना उघडकीस आणली

काही लोक पुस्तक पुजनाच्या नावा खाली बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्तींचे किल्ले रायगडावर विसर्जन करीत असल्याचा त्याच प्रमाणे ही राख चंदन आणि आत्तर मध्ये भिजवुन शिव समाधीला लावत असल्याचा आरोप पुजा झोळे यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप करीत सदर पुस्तक आणि राख सदृष्य पावडर ताब्यात घेतली असुन सदर पावडर केमिकल ॲनालिसेससाठी पाठवला आहे. शिवप्रेमींना समाधी स्थळावर निर्माण झालेल्या वादाचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल केल्यानंतर घडल्या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post