जमाव बंदीचे आदेश , आरोपींना लवकरच अटक करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिलेत.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
यवतमाळ : जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील काळी दौलत इथं युवकाचा काल दुपारी खून करण्यात आला. त्यानंतर युवकाच्या नातेवाईकांनी बसस्थानक परिसरात जाळपोळ केली. दोन गटांत वाद पेटल्यानं गावात पोलिसांचा फौजफाटा दाखल झालाय.काळी दौलत मध्ये जमाव बंदीचे आदेश देण्यात आलेत. गावात सध्या शांतता आहे. आरोपींना लवकरच अटक करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिलेत.
श्याम राठोड हा लक्ष्मण राठोड सोबत दुचाकीनं जात होता. बसस्थानक परिसरात दुचाकीचा एका तरुणाला धक्का लागला. या वरून श्याम व त्याच्या भावा विरुद्ध वाद झाला . वादाचे पर्यवसान तलवारीने वार मरे पर्यंत केले. यात श्यामचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.
पोलीस अधीक्षक घटनास्थळी
आरोपी पसार झाल्यानंतर श्यामच्या नातेवाईकांनी सायंकाळी बसस्थानक परिसरात जाळपोळ केली. खुनाची वार्ता परिसरात पसरली. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी घटनास्थळ गाठले. या घटनेला जातीय रंग देण्यात आला. जुन्या वैमनस्यातून हा खून झाला असावा असा अंदाज आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील काळीदौलत येथे असलेला पोलिसांचा बंदोबस्त.
पोलीस होण्याचे स्वप्न अपुरेच राहिले
श्याम हा २२ वर्षांचा तरुण पोलीस भरतीची तयारी करत होता. पण, या वादात त्याचा बळी गेला. पोलीस होण्याचे श्यामचे स्वप्न अपुरेच राहिले. रोजगारीतूनही काही युवक गुन्हेगारीकडं वळत असल्याचं मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. काळी गावात दंगल नियंत्रण पथक आणि पोलीस दाखल झाले आहेत. संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. युवकाच्या हत्येचे पडसाद गावात उमटले. काळीमध्ये दुकानांची तोडफोड करण्यात आली. जाळपोळ करण्यात आली आहे. काळी दौलत येथे अजूनही तणावाची परिस्थिती आहे. पोलिसांची अतिरिक्त कुमक गावामध्ये दाखल झाली आहे. पोलिसांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत.