प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेच्या वतीने दरवर्षी ठाणे जिल्ह्यातील साहित्यिकांना ललित आणि ललितेतर अशा दोन साहित्य प्रकारात कै. वामन अनंत रेगे पुरस्काराने गौरविण्यात येते. प्रत्येकी रुपये ५ हजार रोख आणि प्रमाणपत्र असे या स्वरूप आहे. सदर वाड्.मयीन पुरस्कार हे रेगे कुटुंबीयांनी प्रायोजित केलेले आहेत, पुरस्काराचे हे २१वे वर्ष आहे. यावर्षीचे पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत,
ललित विभाग लेखक विनोद पितळे "काहिच्या बाही"
ललितेतर विभाग - लेखिका विद्या प्रभू "मालवणी वाक्प्रचार व म्हणी"
ज्येष्ठ साहित्यिक, कवी, गीतकार आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक, संजय कृष्णाजी पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून या समारंभास उपस्थितीत राहणार आहेत, अशी माहिती संस्थेचे कार्यवाह दुर्गेश आकेरकर यांनी दिली. पुरस्कार वितरण समारंभ रविवार दि १२ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६ वा मराठी ग्रंथ संग्रहालय सरस्वती मंदिर, रेगे सभागृह, पहिला मजला, जिल्हा परिषद कार्यालयासमोर स्टेशन रोड, ठाणे (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे तरी सर्व साहित्यप्रेमी रसिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.
कार्यवाह,ठाणे
मराठी ग्रंथ संग्रहालय,
संपर्क:02225406787