प्रेस मीडिया वृत्तसेवा :
शिरोळ:
कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार, शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणिश्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन, माजीआमदार स्व.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या शताब्दी जयंती निमित्त आचार्य तुलसी ब्लड बँक, जयसिंगपूर व सिध्दीविनायक ब्लड बँक, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने श्री दत्त कारखान्याच्या आरोग्य केंद्रामध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीराचे उद्घाटनकारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील व दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखरकारखान्याचे ज्येष्ठ संचालक धनगोंडा पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, श्री दत्त उद्योग समुह हा सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असतो.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. देशातील गरजू लोकांना रक्तदानाचा लाभ व्हावा या हेतुने स्व.सा.रे.पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. सदरचा उपक्रम हा स्तुत्य असा आहे. यावेळी दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, प्रॉडक्शन मॅनेजर विश्वजीत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अशोक निर्मळे, डॉ.कुमार पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली.या शिबीरामध्ये २१८ रक्तदात्यानी रक्तदान केले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालकमंडळ, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.रेखा शेरबेट, डॉ.गजानन चौगुले, डॉ.प्रिया खाडे, व त्यांचे सर्व सहकारी, कारखान्याचे सर्व खाते प्रमुख, कर्मचारी, रक्तदाते, सभासद उपस्थित होते. सदरचे रक्तदान शिबीर यशस्वीपणे पारपाडण्यासाठी आचार्य तुलसी ब्लड बँक जयसिंगपूरचे पीआरओ जितेंद्र पत्की व त्यांचे सहकारी व सिध्दीविनायक ब्लड बँक मिरजचे पीआरओ आरिजय शिरोट व त्यांचे सहकारी तसेच शर्कराऔद्योगिक श्रमिक संघ (इंटक)चे सर्व आजी, माजी पदाधिकारी, सदस्य व कामगारांची मोलाचीसाथ लाभली.
यावेळी स्वागत कामगार युनियनचे अध्यक्ष प्रदिप बनगे व आभार शिक्षण व आरोग्य संचालक अंबाप्रसाद नानीवडेकर यांनी मानले.