श्री दत्त साखर-शिरोळच्या वतीने विनम्र अभिवादन..
प्रेस मीडिया वृत्तसेवा : शिरोळ:
कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार, शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन, माजी आमदार स्व.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटीलसाहेब यांची शताब्दी जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारती समोर उभारण्यात आलेल्या पुर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करुन साजरी करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्याचप्रमाणे स्व.दत्ताजीराव कदमआण्णा यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासही संचालक इंद्रजित पासगोंडा पाटील यांनी, स्व.दिनकरराव यादव यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक रघुनाथ देवगोंडा पाटील यांनी व स्व.विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक ॲड. प्रमोद वसंत पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्व संचालक व इतर मान्यवरांनी पुष्पकमल अर्पण करुन अभिवादन केले.
तसेच याप्रसंगी आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, आगरचे सरपंच अमोल चव्हाण, माजी आमदार उल्हासदादा पाटील, दत्त तोडणी वहातूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील-नरदेकर, पंचगंगा कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील यांनी स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी कारखान्याचे संचालक अनिलकुमार यादव,बाबासो पाटील, शरदचंद्र पाठक, अरुणकुमार देसाई, विश्वनाथ माने, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, संचालिका विनया घोरपडे, यशोदा कोळी, संगिता पाटील-कोथळीकर, रणजित कदम, महेंद्र बागे, विजय सुर्यवंशी, प्रदिप बनगे, मलकारी तेरदाळे, बाळासाहेब पाटील-हालसवडे, दरगू माने-गावडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील यांचेसह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. तसेच नांदणी बँकेचे चेअरमन आण्णासाहेब लड्डे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, चंगेजखान पठाण, शैलेश आडके, बापूसो परीट, विश्राम कोळी, रणजित पाटील, अनंत धनवडे, शिरोळचे नगरसेवक योगेश पुजारी, पंडीत काळे, विठ्ठल पाटील, कोथळीचे सरपंच वृषभ पाटील, धनगोंडा पाटील, शिरोळचे माजी सरपंच गजानन संकपाळ, पिंटू फल्ले, जयसिंगपूरचे नगरसेवक संजय पाटील-कोथळीकर, मुसा डांगे,नितीन बागे, दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, चंद्रकांत जाधव-घुणकीकर तसेच रावसाहेब गळतगे, एकनाथ पाटील, महांतेश जुगळे, शितल उपाध्ये, दिलीपराव माने, दत्त कामगार युनियनचे माजी अध्यक्ष रावसाहेब भोसले यासोबतच महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्व सभासद, कार्यकर्ते तसेच कामगार युनियन, कामगार सोसायटी, पॉलिटेक्निक कॉलेज, आयटीआय व दत्त भांडारचे सर्व संचालक, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जन्मशताब्दीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे कारखाना आरोग्य केंद्रावर रक्तदान शिबीर आयोजित केले होते.