प्रेस मीडिया वृत्तसेवा :
शिरोळ : प्रतिनिधी
पंचगंगा नदी प्रदूषणामुळे मासे मृत्युमुखी पडले असून पाणी पिण्यास आयोग्य झाले आहे,
केमिकलयुक्त पाणी आल्याने नदीचे प्रदूषण करणाऱ्या व्यक्ती ,संस्था व कारखाने यांच्यावर कठोर कारवाई करावी, फौजदारी दाखल करावी व भविष्यात नदी प्रदूषण होणार नाही याची हमी द्यावी या मागणीसाठी स्वराज्य क्रांती जनआंदोलनाचे शिरोळ तालुका नेते आदम मुजावर, गजानन पवार, संतोष शिंगाडे व कैलास काळे यांनी शिरोळ तहसील कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आले,
दरम्यान , कोल्हापूर प्रदूषण प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी इंचलकरंजी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस लागू केली असून पंचगंगा नदी प्रदूषण करणाऱ्या घटकावर कारवाई केली जाईल असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेत असल्याचे आदम मुजावर यांनी सायंकाळी जाहीर केले ,
गेल्या आठवड्याभरात पंचगंगा नदीमध्ये केमिकल पाणी आल्यामुळे पंचगंगा नदीतील मासे मृत्युमुखी पडले, पाण्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आली आहे, त्यामुळे शिरोळ तालुक्यातील लोकप्रतिनिधी या नात्याने व त्याने दिलेल्या मतदानातील जबाबदारी म्हणून शिरोळ तालुक्यातील नागरिकांच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रशासनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे याकरिता मंगळवार पासून बेमुदत धरणे व आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते, दरम्यान, मंगळवारी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विलास कांबळे, प्रसिद्धीप्रमुख विश्वास कांबळे, आरपीआयचे राजेश शिंदे यांनी या उपोषण आंदोलनास भेट देऊन पाठिंबा दिला,