शिरोळ तालुका सेवा सोसायटी गटातून उद्यानपंडित गणपतराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल...
शिरोळ/प्रतिनिधी:
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी शिरोळ संस्था गटातून दत्त साखरचे चेअरमन गणपतराव पाटील हे बिनविरोध होणारच, असा विश्वास व्यक्त करून जिल्हा पातळीवरील राजकीय नेत्यांनी याबाबत ठाम व ठोस भूमिका न घेतल्यास शिरोळ तालुक्याची ताकत जिल्ह्याच्या राजकारणात दाखवून देऊ, असा इशारा मा. खा. राजू शेट्टी यांनी बुधवारी दिला.
दत्त कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचा जिल्हा बँक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर तमदलगे (ता. शिरोळ) येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सूतगिरणीवर कार्यकर्त्यांचा व ठराव धारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेट्टी बोलत होते. मेळाव्याला 100 हून अधिक ठराव धारकासह तीन हजारहून अधिक कार्यकर्ते पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२१-२६ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी माजी खास. राजू शेट्टी, माजी आम. उल्हास पाटील, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन विठ्ठलराव नाईक-निंबाळकर आदींच्या उपस्थितीत शिरोळ तालुका सेवा सोसायटी गटातून उमेदवारीचा उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२१-२६ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मा. खास. राजू शेट्टी, मा. आम. उल्हास पाटील, जिल्हा बँकेचे मा. चेअरमन विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थित शिरोळ तालुका सेवा सोसायटी गटातून माझ्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यात आला.
गणपतराव पाटील म्हणाले, दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार, माजी आम. सा. रे. पाटील साहेबांच्या निधनानंतर मी पहिली सार्वत्रिक निवडणूक तुमच्या साथीने, तुमच्या विश्वासावर लढवित आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने मला या तालुक्याचा शाश्वत विकास करण्याची संधी आपण सर्वानी मिळून द्याल असा ठाम आत्मविश्वास मला वाटतो. तालुक्यात क्षारपड जमीन सुधारणा करून शेतकऱ्यांना नवसंजीवनी निर्माण करून देण्याकरिता आपण मला संधी द्यावी अशी मी विनंती करतो.
यावेळी माजी आम. उल्हास पाटील यांनी निवडणूकीच्या निमित्ताने गणपतराव पाटील यांचे शाश्वत विकासाचे नवे पर्व तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू होत असल्याचे सांगितले.
यावेळी ज्येष्ठ नेते आण्णासाहेब पाटील, कुरूंदवाडचे नगराध्यक्ष जयरामबापू पाटील, गोकुळचे माजी चेअरमन दिलीपराव पाटील, मयूर उद्योग समूहाचे डॉ. संजय पाटील, शिरोळ तालुका भाजपा नेते अनिलराव यादव, दलितमित्र अशोकराव माने, मा. जि. प. बांधकाम सभापती सावकर मादनाईक, राष्ट्रवादीचे नेते चंगेजखान पठाण, माधवराव धनवडे, जि. प. सदस्य विजय भोजे, राजवर्धन निंबाळकर, संदीप कारंडे, धनगोंड पाटील, राम शिंदे, विजय पाटील, नृसिंहवाडीचे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, काँग्रेसचे शिरोळ तालुका अध्यक्ष सर्जेराव शिंदे, गुंडूनाना दळवी, दत्त कारखान्याचे संचालक रणजित कदम, शेखर पाटील, दरगू गावडे, महेंद्र बागे, अमरसिंह निकम, सदाशिव पोपळकर, अनंत धनवडे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव, उदयसिंह जगदाळे, यांच्यासह दत्त कारखान्याचे संचालक, शिरोळ तालुक्यातील ठरावधारक, विविध पक्षांचे पदाधिकारी, आजी माजी नगसेवक, नेतेमंडळी, कार्यकर्ते उपस्थित होते.