काळे कृत्य करणार्या नराधमाला अटक करण्यात आली..
प्रेस मीडिया वृत्तसेवा
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यातील धोत्रेवाडी आंबिवली येथे घडली. हे काळे कृत्य करणार्या नराधमाला रविवारी (26 डिसेंबर) रात्री अटक करण्यात आली आहे.
आरोपी याचा फोटो मिळाला नसून बातमी वाचक वर्गात नावानेच वाचायला मिळत असून फोटो पोलीस यांच्याकडून मिळाला असता सदर व्यक्ती ओळखता आले असते. धोत्रे येथे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.16 वर्षीय पीडित मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत, धोत्रेवाडी आंबिवली येथे राहणार्या या नराधमाने घरात प्रवेश केला. पीडित मुलगी घराच्या हॉलमध्ये झोपलेली असताना, तिला उचलून त्याने आतल्या खोलीत नेले आणि तिच्यावर लैंगिक हमला केला. तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.पीडित मुलीच्या तक्रारीनंतर याप्रकरणी सदर नराधमाविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी भा.दं.वि.क. 354, 354(ल), 452, पोक्सो कायदा, 2012 चे कलम 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला रविवारी (26 डिसेंबर) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे.