महिला सरपंचाची हत्या नग्नावस्थेत सापडला मृतदेह.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
सरपंच महिला सकाळी चुलीसाठी जळणारी लाकडं गोला करायला घराबाहेर पडली होती मात्र दुपारी दोन वाजताच्या सुमारास एका व्यक्तीला जंगलात त्यांचा मृतदेह आढळला. त्याने पोलीस पाटलांच्या माध्यमातून महाड पोलिसांना या विषयीची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन महिला सरपंचाचा मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. महाड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
रायगड जिल्ह्यातील महाड तालूक्यात महिला सरपंचाची हत्या करुन तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत जंगलात टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. महिलेवर बलात्कार किंवा अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. जंगलात रस्त्याच्या कडेला दुपारी त्यांचा मृतदेह सापडला होता. या घटनेमुळे सध्या महाड तालूक्यात सांताप व भितीचं वातावरण आहे.
काय आहे प्रकरण..?
मयत महिला सरपंचाच्या डोक्यावर लाकडासारख्या वस्तूने जोरदार प्रहार करण्यात आला आहे. घटनास्थळी त्यांना फरफटत आणल्याच्याही खुणा सापडल्या आहेत. त्यामुळे अन्य ठिकाणी त्यांची हत्या करुन मृतदेह जंगलात टाकल्याचा अंदाज आहे.
चुलीसाठी लाकडं गोळा करायला जंगलात.
सरपंच महिला सकाळी चुलीसाठी जळणाची लाकडं गोळा करायला घराबाहेर पडली होती, मात्र दुपारी दोन वाजताच्या सुमारास एका व्यक्तीला जंगलात त्यांचा मृतदेह आढळला. त्याने पोलीस पाटलांच्या माध्यमातून महाड पोलिसांना याविषयीची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन महिला सरपंचाचा मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. महाड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
महिलेवर हत्येपूर्वी बलात्काराच्या प्रयत्नाचा संशय.
मृतदेह विवस्त्र अवस्थेत असल्यामुळे हत्येपूर्वी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाले असावेत, किंवा तसे प्रयत्न झाले असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ही हत्या नेमकी कोणी केली? हत्येचं कारण काय? राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली की अन्य कुठल्या कारणास्तव झाला ? याचा अद्याप शोध लागलेला नाही.