प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :सुनील पाटील
महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक, रायगड भूषण पंडित उमेश चौधरी यांच्या शास्त्रीय संगीत गायनाची मैफिल रोटरी क्लब ऑफ वाई च्या वतीने ०५ डिसेंबर रोजी वाई (सातारा) येथे आयोजित करण्यात आली आहे.
कोरोनाच्या संकटातून जवळपास दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा गायक व श्रोता एकत्रित येण्यास प्रारंभ झाला आहे. आणि हि कलेची संस्कृती वृंध्दीगत करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन महत्वाचे आहे, त्या अनुषंगाने पंडित सदाशिव पवार स्मृतिदिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ वाई यांच्यावतीने रायगड जिल्ह्यातील शास्त्रीय संगीताची शान असलेले पंडित उमेश चौधरी यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. त्यांना तबल्यावर निषाद पवार, हार्मोनियमवर सुरेश फडतरे, पखवाजावर किरण भोईर तर गायन साथ मंगेश चौधरी आणि अक्षय चौधरी यांची असणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३१३२ गव्हर्नर स्वाती हेरकळ तर विशेष उपस्थिती उस्ताद अजीम खान यांची असणार आहे.
पंडित उमेश चौधरी यांनी शिक्षणात पदवीधर, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची ’विशारद’ पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. दूरदर्शन, आकाशवाणी तसेच विविध कार्यक्रमात त्यांनी आपल्या सुरमयी कलेने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या मासिक संगीत सभेच्या माध्यमातून पनवेल तालुका सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शेकडो कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. देशभरात विविध ठिकाणी संगीताचे कार्य करत असताना त्यांनी आपल्या कलेची छाप सोडली आहे, त्यामुळे त्यांचा भीमसेन जोशी गानगंधर्व, रायगड भूषण, रायगड गौरव असे आणि बरेच पुरस्काराने गौरव झाला आहे. त्यांच्या गायनाने संगीत मैफिल प्रफुल्लीत होत असते म्हणून वाई रोटरी क्लबने या संगीत मैफिलीचे आयोजन केले आहे.