प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिला प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त कटगुण (ता. खटाव) येथे रविवारी (दि. 28) झालेल्या कार्यक्रमात शिल्पा देवेंद्र बारसिंग यांना सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय सदाशिव कबुले यांच्या हस्ते तालुका स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शिल्पा बारसिंग या सध्या ढोकळवाडी (ता. खटाव) येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असून त्यांनी कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन विविध प्रकारे शालेय शिक्षण देण्याचे काम केले, तसेच त्यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून माहुली गावात अनेक उपक्रम राबविले आहेत. या कार्याची दखल घेत बारसिंग यांना सन्मानित करण्यात आले.
सांगली जिल्ह्यातील विटा येथील मनमंदिर बँकेचे व्यवस्थापक भूपेंद्र बाबूराव बारसिंग यांचे लहान बंधू व माहुली ग्रामपंचायतीचे सदस्य डॉ. देवेंद्र बारसिंग यांच्या शिल्पा या पत्नी असून मिळालेल्या या आदर्श शिक्षक पुरस्काराबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.