आरोपीला 12 तासाच्या आत जेरबंद
प्रेस मीडिया वृत्तसेवा
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
माथेरान मध्ये इंदिरा गांधी नगर मध्ये एका खोलीत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. चारित्र्याच्या संंशयावरुन पतीनेच तिची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या प्रकरणी आरोपीला रायगड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने 24 तासाच्या नवीन पनवेल येथून घरातून ताब्यात घेतले आहे. तसेच पत्नीचे शीर माथेरान मिनीट्रेन मार्गावरील सखाराम तुकाराम पॉईंट येथे दरीत फेकून दिले होते. ते शीर देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नवीन पनवेल येथे राहणारे या उत्तर भारतीय जोडप्याचे मे 2021 मध्ये लग्न झाले होते. दोघेही नोकरीनिमित्त बाहेर राहत असल्याने संशय वाढला आणि माथेरान येथे येऊन त्या तरुणाने पत्नीचा खून केला.
नवीन पनवेल येथे राहणारा तरुण रामसिलोचन पाल हा मुळचा उत्तर प्रदेशातील असून तो व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्याचे मुंबई, मालाड येथे राहणार्या तरुणीबरोबर मे 2021 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये लग्न झाले होते.परंतु परिचारिका म्हणून सेवेत असलेल्या पूनम या आपल्या आईवडिलांकडे मालाड येथे राहून नोकरी करीत होत्या. सुट्टीला नवीन पनवेल येथील घरी हे दोघे जोडपे एकत्र येत. त्यात त्यांना एकत्र राहता येत नसल्याने दोघांमध्ये चिडचिड होत होती. त्यामुळे दोघांनी एकांत मिळावा, म्हणून 11 आणि 12 डिसेंबर रोजी माथेरान येथे येऊन एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. ते दोघे माथेरान येथे 11 डिसेंबर रोजी सायंकाळी उशिरा आले होते. सायंकाळी साडेसात वाजता हे जोडपे माथेरानमधील इंदिरानगर भागातील साईसदन या लॉजवर रूम भाड्याने घेऊन थांबले. ते सकाळी नऊ वाजता निघून जाणार होते. मात्र त्यावेळी त्या तरुणाच्या डोक्यात काहीतरी वेगळेच चालले होते. पती-पत्नी असूनही त्याने स्वतःचे नाव अमजद खान आणि पत्नीचे नाव रुबिना बेगम असे नोंद केले होते. त्याने दिलेला मुंबई येथील पत्ता देखील खोटाच होता. पोलिसांची दिशाभूल करण्याच्या हेतूने त्याने पुर्वतयारी केली होती.
चारित्र्याच्या संशयावरुन समालोचन पाल याने टीव्हीवरील मालिका बघून त्यानुसार पत्नीला संपविण्याचा कट रचला. त्यानुसार रात्री तिचा गळा दाबून तीचे शीर बाजूला केले. पुनमच्या हातावर असलेल्या टॅटूमुळे तिचा शोध लागू नये, म्हणून टॅटू असलेला शरीरचा भाग देखील वेगळा केला. तर पत्नीच्या अंगावरील कपडे काढून या तरुणाने पहाटे रूम सोडली आणि सात वाजता नेरळ येथे पोहचला. तत्पूर्वी इंदिरानगर भागातील सखाराम तुकाराम पॉईंट येथील दरीमध्ये पूनमचे शीर आणि कपडे फेकून दिले. विवस्त्र आणि शीर नसलेल्या अवस्थेत महिलेचा मुतदेह आढळून आल्याने माथेरानमध्ये खळबळ माजली होती.
याबाबतची माहिती मिळताच, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, उपनिरीक्षक कदम तसेच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडूलकर, उपनिरीक्षक सचिन गावडे यांचे गुन्हे प्रकटीकरण टीम आणि कर्जतच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची टीम माथेरानला पोहचली.
माथेरानचे सहायक पोलीस निरीक्षक संजय बांगर, उपनिरीक्षक केतन सांगळे यांच्यासह पोलीस हवालदार अविनाश ठाकूर, महेंद्र राठोड, पोलीस नाईक खतेले, राकेश काळे, सुनील पाटील, प्रशांत गायकवाड यांच्या टीमने तपास सुरु केला.
सायबर सेलने माथेरान इंदिरानगर आणि अमन लॉज तसेच दस्तुरी नाका येथे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या तरुणीकडे असलेल्या पर्समुळे पूनम पाल यांच्या खुनाच्या तपासाला गती मिळाली. मिनीट्रेनच्या ट्रॅकच्या रस्त्यावर अमन लॉजच्या रस्त्याने शोध घेत जात असताना पोलिसांना एक पर्स सापडली. ती पर्स आणि सीसीसीटीव्ही फुटेजमधील पूनम पालकडे असलेली पर्स आणि सखाराम तुकाराम पॉईंटवरील झाडीत अडकलेली पर्स सारखीच होती. त्या पर्समध्ये मेकअपचे साहित्य आणि डोळ्यांच्या चष्म्याची चिट्ठी आढळून आली.
त्या चिट्ठीवरील नंबरवरून सायबर सेलने तपास सुरु केल्यावर आरोपी समालोचन पाल याचा नंबर मिळाला. त्यावेळी आरोपीचे मोबाईल लोकेशन पाहून नेरळ पोलीस ठाण्याची गुन्हे प्रकटीकरण टीम पनवेल येथे पोहचली.
पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्यासह पोलीस उपनिरिक्षक सचिन गावडे तसेच ठाकरे, संदीप पाटील, भाऊ आगध, शरद फरांदे, पालवे, नागरगोजे, अक्षय पाटील आणि तुषार घरत यांनी समालोचन पाल याला 12 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता ताब्यात घेतले. तपासता आरोपीने टीव्हीवरील मालिका बघून तिचा खून केला असल्याची कबूली दिली.
खुनाचे कारण...
उत्तर भारतामध्ये आजही जुन्या पंरपरा, रीती, रिवाज, हुंडा या परंपरा मानल्या जातात. लग्न करून मुंबईत आल्यानंतर पैशासाठी पुनमच्या घरच्याकडे तगादा लावला जात होता. तर दुसरीकडे पत्नी सोबत राहत नसल्याने आणि ती परिचारिका म्हणून सेवा करीत असल्याने चारित्र्याबाबत संशय अधिकच