रंगे हाथ लाच लूचपतच्या जाळ्यात
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
मोजणी नकाशा देण्यासाठी दहा हजाराची लाच स्वीकारताना कर्जत तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील छाननी लिपिक दत्ता जाधव यांना रंगेहाथ पकडण्यात आले रायगड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.या बाबत एका शेतकर्याने तक्रार केली होती.
कर्जत तालुक्यातील आरवंद येथील शेतकर्याने आपली सात गुंठे जमीन कर्जत भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करुन घेतली होती. 25 ऑक्टोबरला आरवंद येथील जमिनीची मोजणी झाल्यानंतर त्या मोजणीचा नकाशा तसेच हद्द निश्चित करणारे प्रमाणपत्र देण्याचे काम या कार्यालयाचे असते. मात्र छाननी लिपीक दत्ता जाधव हा याकरिता दहा हजार रुपयांची मागणी करीत होता.
कार्यालयात गेल्यानंतर 'पैसे पोहचले नाहीत तर पुढचे काम होणार नाही' असे दत्ता जाधव सांगत होता. शेवटी या शेतकर्याने अलिबाग येथील रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक सुषमा सोनवणे यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली. त्यानंतर आज (10 नोव्हेंबर) दुपारी कर्जत भूमिअभिलेख कार्यालयात सापळा रचण्यात आला.
यावेळी तक्रारदार शेतकर्याकडून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना छाननी लिपीक दत्ता जाधव याला रंगेहात पकडण्यात आले. दरम्यान, कर्जत तालुक्यात अनेक महिन्यांनी लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली असून या कारवाईचे स्वागत केले जात आहे.