कल्याण रेल्वे स्थानकातून सासू-सुनेला अटक.
प्रेस मीडिया वृत्तसेवा
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
रेल्वे स्थानकात किंवा धावत्या ट्रेनमध्ये चोरीच्या घटना कल्याणमध्ये नेहमीच्या झाल्या होत्या.लाखोंची चोरी उल्हासनगर मध्ये राहणाऱ्या एक महिलेनं आपली पर्स चोरी झाल्याची तक्रार दिली होती. या पर्समध्ये ३ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने होते. तपोवन एक्स्प्रेसच्या गाडी पकडत असताना ही चोरी झाली होती. ११ डिसेंबरला चोरीच्या घटनेबाबत पोलिसांना तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्र हलवत कल्याणच्या प्लॅटफॉर्म नंबर चारवरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं.कसा लागला चोरांचा शोध..? रेल्वे क्राईम ब्रांचची कारवाई
चोरीच्या तक्रारींनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीनं बारीक नजर ठेवली होती. त्यानंतर एका व्हिडीओत दोन महिला पर्स चोरी करुन पळ काढताना आढळून आल्या होत्या. या दोन्ही महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानं पोलिसांचं काम अधिकच सोपं झालं. पोलिसांनी या दोन्ही महिलांना सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. अखेर या दोघींनाही अटक करण्यात आली आहे.अधिक तपास सुरु आहे.
अटक कऱण्यात आलेल्या सासूचं नाव रेखा कांबळे असं असून सुनेचं नाव रोझा कांबळे असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आता या दोघींचीही कसून चौकशी केली जात असून त्यांनी अशा आणखी किती चोऱ्या केल्या आहेत, याचा पोलीस शोध घेत आहेत. इतरही अनेक चोऱ्यांमध्ये त्यांचा हात असण्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. आतापर्यंत पोलिसांनी या महिलांकडून ३ लाख रुपये किंमतीचे चोरलेले सोन्याचे दागिने तसंच इतर दोन गुन्ह्यांमधील १ लाख २५ हजार रुपयाचे दागिने अशी एकीण ४ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला