श्रमजीवी आंदोलकांना पोलिसांनी दहिसर चेक नाक्यावर अडवले.
पोलिसांनी अडवल्यामुळे आंदोलकांचा रस्त्यावर ठिय्या
दहिसर चेक पोस्ट परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी.
आंदोलनकांची सरकार विरोधात घोषणाबाजी
प्रेस मीडिया वृत्तसेवा
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
राज्यातील कमी पटसंख्येच्या तब्बल 3037 शाळा शासनाने बंद करण्याचा घाट घातला आहे. या विरोधात आज श्रमजीवी संघटनेने मंत्रालयाकडे कूच करत आंदोलन पुकारलेले, गरिब वस्त्यांवरचया शाळा बंद केल्या आहेत तर हे दप्तर घ्या आणि आम्हाला बकऱ्या चरण्यासाठी मोकळे करा अशी भूमिका श्रमजीवी ने घेत *"दप्तर घ्या बकऱ्या द्या"* असे आंदोलन केले. पालघर ठाणे जिल्ह्यातून मुंबई कडे निघालेल्या आंदोलकांनी सोबत बकऱ्या देखील आणल्या होत्या. दहिसर चेक नाक्यावर पोलिसांनी आंदोलकांना अडवले. त्यामुळे श्रमजीवी आंदोलकांनी दहिसर चेक नाक्यावरच्या ठिय्या आंदोलन सुरह करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
संविधानाने दिलेला शिक्षणाचा हक्क सरकार या शाळा बंद करून हिरावून घेत असल्याने श्रमजीवी संघटनेने सरकारचा निषेध करत हे आंदोलन सुरु केले.
काही आंदोलक मुंबईत आझाद मैदान परिसरात पोहोचले असून मुंबईतही आंदोलन सुरू झाले आहे.