प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
जाताडे गावात आयोजित अखंड हरिनाम सप्तहला माजी आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांची प्रमुख उपस्थिती होती. शनिवार दिनाकं 10 डिसेंबर रोजी जाताडे गावात आयोजित अखंड हरिनाम सप्तह ला *शिवसेना जिल्हाप्रमुख श्री मनोहरशेठ भोईर* यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती, याच जाताडे गावाच्या विकासासाठी *माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर* मोठे योगदान आहे यामध्ये आमदार असताना 12 लाखाचा निधी श्री हनुमान मंदिरासाठी मंजूर केला होता, गावाच्या विकासासाठी 10 लाखाची निधी मंजूर करण्यात आली आहे व मंदिराच्या सभागृहासाठी पत्र्याचे शेड स्वतःच्या खर्चाने करण्याचे जाहीर केले आहे.
या कार्यक्रमास *पनवेल तालुकाप्रमुख श्री रघुनाथशेठ पाटील* उपतालुका संघटक श्री अमित भगत, सामाजिक कार्यकर्ते श्री महेंद्र गायकर, जाताडे गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.