प्रेस मीडिया वृत्तसेवा :
सुनिल पाटील :
जेवण न दिल्यावरून वाकोला पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी हॉटेलच्या कॅशिअरला मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी विक्रम पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
वाकोला परिसरात एक हॉटेल आहे. मंगळवारी रात्री हे त्या हॉटेलमध्ये गेले असता पाटील त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली. रात्री किचन बंद झाल्याने जेवण देता येणार नसल्याचे हॉटेलच्या कॅशिअरने पाटील यांना सांगितले. त्यानंतर पाटील यांनी कॅशिअरची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. मारहाण प्रकरणी हॉटेलच्या मालकाने वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची गंभीर दाखल घेण्यात आली. पाटील यांना निलंबित करून त्यांची आता चौकशी केली जाणार असल्याचे एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले.