माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांचा पाठींबा.
प्रेस मीडिया वृत्तसेवा
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी सफाई कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार-माजी आमदार मनोहरशेठ भोईर उरण विधानसभा मतदारसंघातील उरण नगरपरिषदेमध्ये वर्षानुवर्षे काम करणारे सफाई कामगार *१)किमान वेतन मिळणे, २) भविष्य निर्वाह निधीचा लाभ मिळणे व ३) बोनस मिळणे* या मागण्यांसाठी धरणे आंदोलनाचा बसले आहेत. या कामगारांची *शिवसेना जिल्हाप्रमुख मा. आमदार मनोहर शेठ भोईर* यांनी गुरवार दिनाकं १६ डिसेंबर २०२१ रोजी भेट घेऊन त्यांच्या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला.
*उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी* यांनी बैठक घेऊन एक महिन्याच्या आत किमान वेतन संबधित ठेकेदाराकडून मिळवून देणार, त्याचबरोबर मागील महिन्याचा एरीयर्स मिळवून देणार, कामगारांना बोनस मिळण्याकरीता सुद्धा ठेकेदारासोबत चर्चा झालेली आहे. तसेच भविष्य निर्वाह निधी भरली जाते आहे कि नाही याची खात्री करण्यात येईल व ती शासनाच्या नियमाप्रमाणे भरण्यात येईल. यापुढे कामगारांचे आर्थिक शोषण होणार नाही याची जबाबदारी त्यांनी घेतली.
यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी आंदोलनाला पाठिंबा देताना मुख्याधिकारी यांनी या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असून त्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर सदर सर्व शासन दरबारी मांडून जिथपर्यंत कामगारांचे प्रश्न सुटत नाहीत तिथपर्यंत मी कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार, ए.पी.आय.गिझे, कॉम्रेट भूषण पाटील, अॅड सुरेश ठाकूर, अनिल जाधव व कामगार उपस्थित होते.