आणखी काही टप्प्या टप्याने येण्याच्या मनस्थितीत आहेत.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या निवडणुका तोंडावर असताना माथेरानच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळत आहे.येथील वातावरण नेहमी थंड असते पण हळूहळू हे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.27 मे 21 रोजी शिवसेनेतून भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केलेल्या दहा नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक पुन्हा आपल्या स्वगृही परतले आहेत.शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने खासदार संजय राऊत व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत पुन्हा मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेतून जे दहा नगरसेवक भाजप मध्ये गेले होते त्यापैकी नगरसेविका सुषमा जाधव,सोनम दाभेकर व ज्योती सोनावळे तसेच माजी नगरसेवक व जेष्ठ शिवसैनिक कुलदीप जाधव व सचिन दाभेकर यांनी शिवसेना पक्षप्रवेश केला. यावेळी कर्जत विधानसभा संपर्कप्रमुख राजेश कूचीक,माथेरान संपर्कप्रमुख तथा गटनेते प्रसाद सावंत,युवासेना कर्जत तालुका सचिव प्रथमेश मोरे आवर्जून उपस्थित होते.या सर्व घडामोडीत शिवसेना नेते सुभाष देसाई , शिवसेना सचिव अनिल देसाई, खासदार आप्पासाहेब बारणे, युवासेना सचिव वरूण देसाई,सुरज चव्हाण रायगड जिल्हाप्रमुख मनोहर भोईर,युवा सेना जिल्हाधिकारी मयुर जोशी,ओमकार चव्हाण यांचा महत्वाचा वाटा असल्याचे गटनेते प्रसाद सावंत यांनी सांगितले.ते पुढे हे ही म्हणाले की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसैनिकांसाठी शिवसेनेची दारं सदैव खुली आहेत.आणि हे गेलेले शिवसैनिकच आहेत.सच्चा शिवसैनिक हा शिवसेनेचा अविभाज्य घटक आहे.स्वगृहीं परतलेल्या शिवसैनिकांचा जो सन्मान होता तोच राहणार आहे आणि आणखी काही टप्प्या टप्याने येण्याच्या मनस्थितीत आहेत.