प्रेस मीडिया वृत्तसेवा
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
रायगड जिल्हा पोलीस घटकाच्या कार्यक्षेत्रामध्ये नववर्ष स्वागत 31 डिसेंबर अनुषंगाने रायगड जिल्ह्या सह अलिबाग मांडवा रेवदंडा काशीद मुरूड श्रीवर्धन दिवेआगार याठिकाणी समुद्र किनारपट्टी असल्याने तसेच माथेरान थंड हवेचे ठिकाण खालापूर खोपोली कर्जत या तालुक्यातील फार्म हाऊस तसेच व कॉटेज समुद्र किनारपट्टी वरील गावांमधील हॉटेल लॉज एस कॉटेजेस अशा ठिकाणी मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे येथील महानगरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर नववर्ष स्वागतासाठी व पर्यटनासाठी येत असतात त्या दृष्टीने जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या व कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने विशेष खबरदारी उपाय करण्यात येत आहे तसेच covid-19 तसेच ओमीक्रोन विषाणू महामारी का प्रतिबंध करणे अत्यंत जरुरी आहे खालील प्रमाणे मार्गदर्शन सूचना देण्यात येत आहे.
सध्या कोरो नाच्या प्रादुर्भाव वाढत असल्याने विना mask फिरणाऱ्या इसमावर पोलीस विभागामार्फत विना मास्क केसेस करण्यास मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली असून त्यामुळे नागरिकांनी mask घालावा भंग केल्यास पाचशे रुपये इतका दंडाची कारवाई करण्यात येईल
सार्वजनिक ठिकाणी महिला सोबत छेडछाड अथवा गैरवर्तणूक होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलीस तसेच महिला अमलदार यांची नेमणूक करण्यात आलेली असून असे गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे
दारू पिऊन गोंधळ घालने दारूच्या नशेत वाहन चालवणे तसेच sanruf उघडे करून त्यामध्ये लहान मुलांना उभे करून वाहन चालवणे अशाप्रकारचे गैरकृत्य करणाऱ्या इसमावर त्याची वैद्यकीय चाचणी करून दारूबंदी कायदा व मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस पथक नेमण्यात आलेले आहेत रात्री 21 वाजता नंतर कोणत्याही बीच वर बगिच्यात सार्वजनिक ठिकाणी थांबणार नाहीत तसेच फटाक्यांची आतिषबाजी करणार नाही
राज्य शासनाने व पोलीस प्रशासन यांनी वेळोवेळी दिलेल्या निदर्शना चे नागरिकांनी पालन करणे बंधनकारक राहील
रायगड जिल्ह्यातील एकूण 26 पोलीस ठाण्याकडे प्रत्येकी विशेष पथके तयार करण्यात आली असून हॉटेल थांबे कॉटेज फार्म हाऊस येथे गैरकृत्य होणार नाहीत याची तपासणी करण्यात येणार आहे सर्व पोलीस ठाण्याचे हद्दीतील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी नागरिकांना प्रवास करताना वाहतूक कोंडीचा कोणताही त्रास होऊ नये म्हणून जिल्हा वाहतूक पोलिसांचे मुख्य रस्त्यावर 81 ठिकाणी एकूण 83 वाहतूक पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत पोलीस स्टेशन हद्दीतील समुद्रकिनारी व पर्यटनाचे ठिकाणी सुरक्षे करिता फिक्स पॉईंट पेट्रोलिंग नाकाबंदी व बंदोबस्त करिता 71 पोलीस अधिकारी 402 पोलीस अमलदार यांचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.