माथेरान मध्ये थेट अंगावर काटे आणणारी घटना घडली आहे.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
रेल्वे स्टेशन समोर असलेल्या एका खोलीत महिलेचा मृतदेह आढळून आला....
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिरच्छेद केल्याच्या घटनांची चर्चा सुरू असताना आता माथेरान मध्ये अशी थेट अंगावर काटे आणणारी घटना घडली आहे
माथेरान मध्ये एका खोलीत महिलेचा नग्नावस्थेत मृतदेह सापडला आहे. या मृतदेहाचं शिर बेपत्ता असून, सोबत आलेल्या आरोपी पुरुष ते घेऊन गेल्याची माहिती स्थानिकांकडून दिली जात आहे. या घटनेनंतर माथेरानमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
महिलांवरील वाढते अत्याचार आणि वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर चिंता व्यक्त होत असतानाच आता माथेरानमध्ये खळबळ उडवून देणारी हत्येची घटना समोर आली आहे. माथेरानमध्ये एका महिलेची शिर कापून हत्या करण्यात आली आहे.
माथेरान मधील रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या एका बंद खोलीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. महिलेचा मृतदेह निर्वस्त्र आणि शिर नसलेल्या अवस्थेत आढळून आला असून, घटनास्थळी कोणतीही बँग अथवा सामान आढळून आलेलं नाही. त्यामुळे मयत महिला कोण याबाबतची माहिती कळू शकलेली नाही.बहिणीची हत्या करुन मृतदेह ठेवला घरात, सोसायटीत दुर्गंधी पसरल्यामुळे झाला उलगडा
स्थानिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एक महिला व पुरुष माथेरानमध्ये फिरायला आले होते. त्यानंतर महिलेचा मृतदेह आढळून आला असून, पुरूष मात्र, गायब आहे. महिलेचं शिर आरोपी सोबत घेऊन गेला असावा, असं ग्रामस्थ सांगत आहेत. दरम्यान, माथेरान पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. सध्या पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. महिलेच्या ओळखीसंदर्भातील कोणतेही पुरावे नसल्यानं मृतदेहाची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पोलिसां समोर उभं आहे.
औरंगाबादमध्ये भावानेच बहिणीची हत्या केल्याची घटना
काही दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात भावानेच बहिणीची हत्या केल्याची घटना घडली. कीर्ती थोरे असं या मुलीचं नाव आहे. प्रेमविवाह केल्याच्या कारणातून ही हत्या करण्यात आली. किचनमध्ये गेलेल्या बहिणीचा भावाने शिरच्छेद केला. इतकंच नाही, तर तिचं शिर घेऊन तो बाहेरच्या ओट्यावर आला आणि कीर्तीच्या सासरकडच्या लोकांना दाखवलं. या घटनेची चर्चा असतानाच आता राज्यात शिरच्छेद केल्याची दुसरी घटना समोर आली आहे.