चलो पनवेल प्रांताधिकारी कार्यालय एक दिवसीय लाक्षणिक उपोषण.

 बोरले सांगडे बेलवली पाली खुर्द येथील ग्रामस्थांना उद्या मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

पनवेल तालुक्यातील मुक्काम बोरले सांगाडे बेलवली व पाली खुर्द ही चार गावे विरार-अलिबाग महामार्ग उध्वस्त होत असल्याने पनवेल प्रांताधिकारी समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे.

सिडको नैना एम एम आर डी ए नियोजन अधिकारी यांनी सदर महामार्गाचे आखणी ही चार गावे वगळून केली आहे त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून शासनाच्या दिनांक बारा चार दोन हजार सोळा रोजीच्या छाननी स्क्रुटीनी कमिटीच्या अहवालानुसार ही चार गावे वाचवण्या बाबत सहमती दर्शवली आहे त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून प्रांताधिकारी पनवेल या महामार्गातील नवीन व जुन्या मागणीचा तुलनात्मक अहवाल त्वरित व्हावा व माननीय जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे सदर महामार्गाचे काम एम एस आर डी सी कडे सोपविण्यात आला आहे एम एस आर डी सी ने सुधारित नकाशाची अंमलबजावणी करून घ्या महामार्गातील उध्वस्त होणारी चार गावे वाचवावेत या महामार्गालगत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार आहेत त्या शेतकऱ्यांच्या केंद्रीय सुधारित कायदा 2013 नुसार मोबदला देण्यात यावा.

तसेच भूखंड देण्यात यावेत या कायद्याप्रमाणे सर्व पुनर्वसनाचे फायदे देण्यात यावे वरील एक ते पाच मुद्द्यांची अंमलबजावणी व्हावी अन्यथा सदर महामार्ग काम रद्द करण्यात यावे पनवेल कर्जत नवीन प्रस्तावित रेल्वे महामार्गाच्या भूसंपादनाचे नुकसानभरपाईही रेडी रेकनर दर हा प्रचलित बाजार भावाप्रमाणे आकारण्यात यावा व सर्व पुनर्वसनाचे फायदे देण्यात यावे मुक्काम बोरले येथील पनवेल बायपास वर नॅशनल हायवे मध्ये सर्विस रोड व जाण्यासाठी रस्त्याची सुविधा देण्यात यावी.

वरील मागण्यांची त्वरित अंमलबजावणी व्हावी  वकील सुरेश ठाकूर अध्यक्ष श्री सुधाकर पाटील सरचिटणीस 95 गाव नवी मुंबई  नयना  व इतर प्रकल्पग्रस्त समिती पनवेल श्री नामदेव फडके अध्यक्ष महाराष्ट्र राज्य क्रांतिकारी सेवा संघ महाराष्ट्र राज्य श्री बळीराम गोपी अध्यक्ष श्री सुरेश पवार सचिव नयना प्रकल्प तो कॉरिडोर रस्ते बाधित व शेतकरी ग्रामस्थ श्री सुरेश पवार अध्यक्ष श्री एकनाथ पाटील सचिव विरार अलीबाग कॉरिडॉर रस्ते बाधित शेतकरी व ग्रामस्थ कृती समिती सांगाडे बोरले बेलवली व पाली खुर्द श्री वामन शेळके अध्यक्ष श्री बालाराम फडके सचिव नयना बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेल श्री गोविंद पाटील अध्यक्ष श्री अनिल भोपी सचिव नैना प्रकल्प कॉरिडॉर रस्ते बाधित व शेतकरी व ग्रामस्थ कृती समिती बोरले श्री विवेक महाले उपसर्ग चिटणीस महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कस युनियन मुंबई. सर्व पदाधिकारी उपस्थित असून बोरले सांगडे बेलवली पाली खुर्द येथील ग्रामस्थांना उद्या मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post