प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
विद्याप्रसारणी सभा चौक सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौक यांचा २०२० व २१ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक व उच्चमाध्यमिक परिक्षेत विशेष प्राविण्याने उतीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. अविनाश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांची उपस्थिती होती.
उपमुख्यध्यापिका पुजारी मॅडम यांनी प्रास्ताविकात शैक्षणिक प्रगतीची माहिती देवून प्रामुख्याने कोरोना काळात विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबाबत संस्थेनी केलेल्या कार्याची सविस्तर माहिती दिली. इयत्ता ५ वी ते ९ वी व ११ वी मध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थीनीने यश संपादन केल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. शोभाताई देशमुख, नरेंद्र शहा, योगेंद्र शहा, संचालक बिपीन शहा, संचालिका गायकवाड मॅडम, धनंजय देशमुख यांच्यासह पालक, शिक्षकवर्ग यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात माधव पाटील यांनी देशमुख कुटुंबियांच्या योगदानाचे कौतुक करुन तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात करीत असलेल्या कार्याचा व मागील पिढीचा संबंध असल्याचे सांगून राजकीय नाही तर शैक्षणिक क्षेत्रात संस्था करीत असलेल्या कार्याला मनापासून शुभेच्छा दिल्या.
अॅड. अविनाश देशमुख यांनी आपल्या भाषणात आपल्या सहकारी व शिक्षक वर्गाच्या सहकार्याबाबत आभार व्यक्त करुन संस्थेने केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणजे विद्यार्थ्यांचे सुयश असल्याचे सांगितले.