हेल्मेट नसल्यास परवाना रद्द करण्याचे शासनाचे आदेश

 जिल्हयात विना लायसन्स वाहन चालवणाऱ्यांना ५ हजार रुपयांचा दंड .

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :सुनील पाटील


वाहन चालकाकडे आत्ता हेल्मेट नसल्यास लायसन नच रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेत केंद्रीय सुधारित मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आदेश दिले आहे.

 केंद्राच्या सुधारित मोटर वाहन कायद्याची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता जिल्हयात विना लायसन्स वाहन चालवणाऱ्यांना ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. हेल्मेट न घातल्यास वाहन चालवणाऱ्याचे लायसन्सच देखील रद्द होणार आहे. राज्यात, जिल्हात सध्या अनेक अपघातांमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू हेल्मेट नसल्यामुळे होत असल्याचे अनेक अपघातात दिसून आले आहे. याची दखल घेत राज्याने सुधारित कायद्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.

सुधारित मोटर वाहन कायद्यानुसार आता हेल्मेट न घातल्यास ५०० रुपये दंडासह तीन महिन्यांसाठी लायसन्स देखील रद्द केले जाणार आहे. या व्यतिरिक्त विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्या चालकाचे देखील लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द केले जाणार आहे. वाहन क्रमांकाशी छेडछाड करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. याचबरोबर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास दुचाकींसाठी एक हजार रुपये, ट्रॅक्टरसाठी दीड हजार रुपये, हलक्या वाहनांसाठी दोन हजार आणि इतर सर्व वाहनांसाठी चार हजार रुपये दंड लागू करण्यात आला आहे. याबाबत परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयला कळविले

Post a Comment

Previous Post Next Post