ऊरण शहरातील मच्छी मार्केट व भाजी मार्केट इमारतीच्या बांधकामासाठी एक कोटीचा निधी मंजूर.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर* यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून *उरण शहरातील मच्छी मार्केट व भाजी मार्केट इमारतीच्या* बांधकामासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत एक कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सदर निधी मंजूर केल्याचा *शासन निर्णय क्र.नपावै-२०२१/प्र.क्र.२०१(३)/नवि-१६* ०३ नोव्हेंबर २०२१ रोजी नगरविकास विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
उरण शहरामध्ये एकच मच्छीमार्केट असून सदर इमारत मोडकळीस आलेली असताना सुद्धा उरण नगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाकडून सदर प्रश्नाकडे लक्ष देण्यात आलेला नाही. *माजी आमदार मनोहरशेठ भोईर* यांनी सदर प्रश्न हाती घेत *नगरविकास मंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब* यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी व सततचा पाठपुरावा करून सदर इमारतीकरिता एक कोटींचा निधी उपलब्ध करून घेतला आहे. तसेच सदर कामाचे लवकरच भूमिपूजन *मा.मंत्री महोदयांच्या* हस्ते होणार आहे.
उरण शहरातील मच्छी मार्केट व भाजी मार्केट इमारतीकरिता निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उरण शहरवासीयांच्यावतीने *गटनेते तथा नगरसेवक गणेश शिंदे*, अतुल ठाकूर, समीर मुकरी, नगरसेविका वर्षा पाठारे, नगरसेविका विद्या म्हात्रे यांनी *नगरविकास मंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब व माजी आमदार मनोहरशेठ भोईर* यांचे आभार मानले आहेत.