प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
कोट्यवधी भारतीयांच्या जीवनात स्वाभिमानाची ज्योत चेतावणारे, विश्वभूषण, भारतरत्न, महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोमवार दिनाकं 06 डिसेंबर 2021 रोजी *शिवसेना उरण तर्फे जिल्हाप्रमुख मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर* यांनी विनम्र अभिवादन केले.
या वेळी शिवसेना उरण शहरप्रमुख श्री विनोद म्हात्रे, मा नगरसेवक श्री निलेश भोईर, नगरसेवक समीर मुकरी, निकेतन पाटील, गटप्रमुख संजय मेश्राम, अल्पसंख्याक सेलचे अन्वर कुरेशी, एजाज मुकादम, शादाब शेख, शे का पक्षाच्या सौ सीमा घरत, श्री गायकवाड, श्री पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.