जन जाग्रुती ग्राहक मंच रायगडच्या जिल्हाध्यक्ष पदी मंगेश माळी यांची बिनविरोध निवड .

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

 रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्राहक स्ंस्था म्हणून नावलौकिक असलेल्या  जन जाग्रूती ग्राहक मंच रायगड ची त्रैवार्षिक निवडणूक   दिनांक २६  डिसेंबर २०२१  रोजी पेण गांधी वाचनालय सभागृह येथे खेळीमेळी च्या वातावरणात पार पडली,  मंचाच्या जिल्हाध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते मंगेश माळी  यांची बिनविरोध निवड झाली असुन जिल्हा सचिव पदी खोपोली चे नितिन पाटील तर खजिनदार पदी अलिबाग चे विशाल राऊळ  यांची वर्णि लागली आहे . जिल्हा उपाध्यक्ष पदी पनवेलचे बी.पी.म्हात्रे सर ,  रसायनी चे सुनील वैद्य ,आणि पेण चे गणेश जोशी या तिघांची नियुक्ती करण्यात आली असुन सहसचिव पदी ऊरण चे परमानंद कलगुटकर , खालापूर चे रामानंदन  पाटील , आणि कर्जत सखाराम  शिनगे यांची निवड करण्यात आली आहे तर जिल्हा संपर्क व प्रसिद्धी प्रमुख म्हणून पनवेल चे संतोष विचारे यांची निवड करण्यात आली असून पंचवीस  सदस्यांची जिल्हा कार्यकारणी समिती तयार करण्यात आली आहे.   जिल्हा  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून खारघर च्या चंद्रशेखर मेहर सर यांनी अत्यंत महत्वाची कामगिरी पार पाडली आहे 

पुढील काळात मंचा तर्फे ग्राहकांची होणारी फसवणूक , ठेवीदारांचे बुडीत बँका व पतसंस्था मधे गुंतलेले पैसे , आरोग्य सेवेतील फसवणुक , शिक्षणातील  त्रुटी शिक्षण हक्क कायदा , म.हा.ई .सेवा केंद्रा मार्फत होणारी लुट , बिन पावती चा व्यवसाय करणारे दुध डेअरी , मिठाईवाले , चिकन सेंटर , मटन सेंटर , मोठे भाजी फळ विक्रेते , फसवणूक करणारे व्यापारी , बिल्डर  यांच्या विरोधात आवाज उठवणार असुन  ग्राहक संरक्षण कायदा २०१९  चा प्रचार आणि प्रसार करणार असल्याची माहीती जिल्हा अध्यक्ष मंगेश माळी  यांनी दिली आहे .

Post a Comment

Previous Post Next Post