आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाकर जोशी यांच्या प्रयत्नांना यश
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :सुनील पाटील
तालुक्यातील ओवे विभागातील पेठपाडा, रांजणपाडा आणि मुर्बीपाडा या पाडयांचे गावठाण नगर भूमापन सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने संबधित विभागाला दिले असून आता या पाडयांना महसूल दर्जा प्राप्त होणार आहे. या कामी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे पनवेल तालुका संघटक प्रभाकर जोशी यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा कामी आला आहे.
ओवे या मूळ गावठाणाचे सर्वेक्षण झाले होते. मात्र या विभागातील पेठपाडा, रांजणपाडा आणि मुर्बीपाडा या पाडयांचे गावठाण नगर भूमापन सर्वेक्षण अद्याप करण्यात आले नव्हते. त्यामुळे प्रभाकर जोशी यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे या संदर्भात मार्गदर्शन घेऊन रायगड जिल्हाधिकारी, भूमि अभिलेख, पनवेल महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे मागणी करून सतत पाठपुरावा केला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने ओवे विभागातील पेठपाडा, रांजणपाडा आणि मुर्बीपाडा या पाडयांचे गावठाण नगर भूमापन सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने भूमी अभिलेख जिल्हा अधिक्षक यांना दिले. आणि त्या अनुषंगाने भूमी अभिलेख जिल्हा अधिक्षक यांनी तात्काळ कार्यवाहीसाठी भूमी अभिलेख पनवेल उप अधिक्षक यांना आदेश दिले आहेत. या सर्वेक्षणामुळे या तिन्ही पाडयांना महसुली गावाचा दर्जा प्राप्त होणार असून येथील नागरिकांनी आमदार प्रशांत ठाकूर व प्रभाकर जोशी यांना धन्यवाद देऊन त्यांचे आभार मानले.