प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
दर्जेदार शिक्षणासोबत कला, क्रीडा, सामजिक क्षेत्रातही उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या नामवंत अशा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्त्रोत स्वर्गीय चांगू काना ठाकूर यांच्या स्मरणार्थ शनिवार दिनांक ११ डिसेंबर रोजी दुपारी ३. ३० वाजता सीकेटी महाविद्यायातील (स्वायत्त) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यायात हा सोहळा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डीएव्ही मुंबई महाविद्यालयाचे प्राचार्य व मुंबई विद्यापीठाच्या कॉमर्स अँड मॅनेजमेंटचे अधिष्ठाता डॉ. अजय भामरे, मुंबई विद्यापीठाचे रजिस्टार सुधीर पुराणिक, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तर प्रमुख मान्यवर म्हणून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, कार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमोल, संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य व पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, संतोष शेट्टी, हेमलता म्हात्रे, एकनाथ गायकवाड, सीता पाटील, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, कार्यकारी मंडळ सदस्य संजय भगत व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.