माजी आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांचा पाठींबा.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
उरण विधानसभा मतदारसंघातील खालापूर तालुक्यातील पातळगंगा एम आय डी सि मधील एजे बिग कॉला कंपनी मध्ये माथाडी कामगार पगार वाढीसाठी संपावर बसले आहेत, या कामगारांची *शिवसेना जिल्हाप्रमुख मा. आमदार मनोहर शेठ भोईर* यांनी मंगळवार दिनाकं 14 डिसेंबर 2021 रोजी भेट घेऊन त्याच्या संपला पाठिंबा दिला आहे तसेच कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे .
या *वेळी उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर, रायगड जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे,* सुनील थोरवे, ग्रामपंचायत सदस्य महादेव गडगे आणि पंच क्रोशीतील शिवसैनिक मोठ्या संख्येने कामगारांना सहकार्य करायला उपस्थित होते.