उरण विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :सुनील पाटील

 उरण विधानसभा मतदारसंघातील तुरमाळे, बारवई, सांगुर्ली या ठिकाणी रस्ते काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन, लाडीवली येथे पाण्याच्या पाईपलाईनचे लोकार्पण आणि करंजाडे येथे शौचालयाच्या कामाचे भूमिपूजन रविवारी

(दि. 5) आमदार महेश बालदी, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार बालदी यांनी छळ आणि कपटामुळे तुम्हाला राज्यात सत्ता मिळाली आहे, अशी घणाघाती टीका विरोधकांवर केली.

पनवेल आणि उरण तालुक्यात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांमुळे विकासाची गंगा वाहत आहे. त्या अंतर्गत आमदार महेश बालदी यांचा विकास निधी, जिल्हा नियोजन निधी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि सिडकोच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण झाले. यामध्ये 25 लाख निधीमधून तुरमाळे गावापासून बसस्टॉपपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण, तीन लाख निधीमधून बारवई गावातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण, जिल्हा नियोजनच्या 10 लाख निधीतून सांगुर्ली गावापासून स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण, सिडकोच्या माध्यमातून करंजाडे बौद्धवाडा येथे 30 लाख रुपयांच्या शौचालय कामाचे भूमिपूजन या कामांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सांगुर्ली बसस्टॉपपासून ते गावापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. या कामाचे उद्घाटन आणि आमदार महेश बालदी यांच्या विकास निधीतून लाडीवली गावातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन या 17 लाख 83 रुपयांच्या कामाचे लोकार्पण रविवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

ठिकठिकाणी झालेल्या विकासकामांच्या शुभारंभास भाजप नेते कर्णा शेलार, करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे, समीर केणी, सदस्य स्वप्नाली कांबळे, माजी अध्यक्ष मदन गायकवाड, रमाईनगर अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, सुनील साबळे, शेखर गायकवाड, स्मिता गायकवाड, केळवणे जि. प. विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी, के. सी. पाटील, किसान मोर्चाचे ग्रामीण अध्यक्ष आत्माराम हातमोडे, सांगुर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच पद्माकर कातकरी, दत्तात्रेय हातमोडे, शरद वांगीलकर, सुनील गवंडी, गुळसुंदे जि. प. विभागीय अध्यक्ष व सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाश गाताडे, सुनील माळी, गुळसुंदे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिष बांडे, तालुका उपाध्यक्ष संजय टेंबे, प्रवीण खंडागळे, पोयंजे पं. स. विभागीय अध्यक्ष प्रवीण ठाकूर, माजी उपसरपंच जनार्दन पाटील, सुनील दळवी, कसळखंडचे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, उपसरपंच महेंद्र गोजे, महेंद्र पाटील, गणेश आगीवले, सचिन दुर्गे, तानाजी पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

या वेळी आमदार महेश बालदी यांनी पुढे बोलताना सांगितले की, आपण कोणतेही विकासकाम केले की विरोधकांच्या पोटात दुखायला लागते. त्यांना हे नाही समजत की काम समाजाचे आहे. पाच वर्षे तुम्हाला जनतेने संधी दिली होती. त्या वेळी तुम्हाला विकासाची कामे का सुचली नाहीत? आम्ही सर्व समस्या सोडविण्याकरिता पुढाकार घेतो. त्यामुळे तुमचे डोळे उघडले हे निश्चित.

जनतेच्या समस्या जाणून त्यांच्या भल्यासाठी एकत्र येऊन समस्या सोडवूया, पण ही स्पर्धा करीत असताना एखादी योजना अडकू नये याची काळजी राज्यकर्त्यांनी घ्यावी, असा सल्ला देत तुमच्या गावातील ज्या ज्या समस्या असतील त्या मला सांगा. तुम्ही मत देऊन निधी उपलब्ध देण्याची जी जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर सोपवली आहे ती मी समर्थपणे पूर्ण करेन, अशी ग्वाहीदेखील आमदार बालदी यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post