जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे .
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
24 डिसेंबर म्हणजे राष्ट्रीय ग्राहक दिन आज मा. मुख्यमंत्री, मुख्य सचिव, कोकण आयुक्त , जिल्हा धिकारी रायगड यांना मंचा तर्फे लेखी निवेदन दिले आहे यात ग्राहकांची होणारी फसवणूक व शासकिय अनियमितता यांचा समावेश आहे म.हा.ई.केंद्र चालकांकडून नागरिकांची होणारी लुट , केंद्र चालकांनी दुकान बाहेर पाटी लावावी त्या वर दिल्या जाणाऱ्या सेवा , विहीत कालावधी व रक्कम लिहावी यासह तलाठी कार्यालयात तलाठी नसणे ,त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय , जिल्ह्यातील बुडालेल्या बँका मधील ठेविदारांचे पैसे मिळावेत , रेशनिंग मध्ये बोगस लाभार्थी वगळावेत व विधवा , निराधार , परित्यक्ता , अपंग यांच्या सह खऱ्या लाभार्थांना धान्याचा लाभ मिळावा , एका रेशनिंग दुकानदाराकडे चारशे ते पाचशेच कार्ड असावीत ,अनेक चिकन विक्रेते , मटण विक्रेते , मिठाईची दुकाने , खाद्यपदार्थ विक्रेते पावत्या देत नाहीत यावर वजन मापे कार्यालय व अन्न औषध प्रशासन काही कारवाई करत नाहीत, यावर जिल्हाधिकारी यांनी व पुरवठा अधिकारी यांनी लक्ष द्यावे व कारवाई करावी . अशी मागणी आज केल्याचे जन जाग्रूती ग्राहक मंचाचे जिल्हा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते मंगेश माळी यांनी सांगितले आहे निवेदन देतांना अलिबाग शाखा अध्यक्ष AD. रूपेश पाटील , सचिव सुरेश खंडागळे , सदस्य वासुदेव कनोजे , हेमंत लोहार , अरूण गोंधळी , AD.. प्राजक्ता माळी उपस्थित होते.
मागण्यांचा विचार न केल्यास व योग्य कारवाई न केल्यास आंदोलन करणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष मंगेश माळी यांनी सांगितले आहे.