राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला अटक.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
पनवेल शहर राष्ट्रवादी युवक कांग्रेस कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांना खारघर पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याविरोधात तरुणीवर बलात्कार व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
२९ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी रात्री त्याना अटक करण्यात आली आहे. शहबाज पटेल यांच्या ओळखीच्या तरुणीने ही तक्रार दिली आहे. शहबाज यांनी लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार दिल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. तरुणीने त्यांच्याकडे लग्नाचा तगादा लावला असता, आपल्याला जातिवाचक शिवीगाळ झाल्याचाही आरोप तिने केला आहे.
त्यानुसार शहबाज पटेलविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, मंगळवारी रात्री पोलिसांनी पटेल याना अटक केली आहे. पटेल यांच्या कुटुंबीयांकडून त्यांच्यावरील आरोपाचे खंडन केले जात आहे. या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांनी पटेल याना पदावरून निलंबन करण्यात आले आहे.