मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते संपन्न..
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
उरण तालुक्यातील केगाव विभागातील जेष्ठ साहित्यीक माननीय *श्री गजानन दर्णे यांनी लिहिलेल्या दोन एकर जमीन' या कथा संग्रहाचे सोळावे प्रकाशन मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर* यांच्या हस्ते रविवार दिनाकं 5 डिसेंबर 2022 रोजी केगाव येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री लक्ष्मण वीर सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री मोहन भोईर, श्री संतोष पवार, श्री श्री धनंजय गोधळी, श्री ए डी पाटील, श्री विलास नाईक, श्री आय बी सिंग व मान्यवर उपस्थित होते.
या वेळी *मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर* यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की श्री दर्णे साहेब, वयाच्या 72 व्या वर्षीही हे लिखाण करतात ते आमच्यासाठी खुप प्रेरणा देणारे आहे, नवीन पिढीने त्यांची पुस्तके वाचून आपल्या जीवनात चांगला आदर्श घ्यावा. वयाच्या शंभरी पर्यंत त्यांनी असेच लिखाण करत राहो व जीवनाचा आनंद घेत जावो आशा शुभेच्छा दिल्या, या कार्यक्रमास मा सरपंच श्री जगजीवन नाईक ग्रामपंचायत सदस्य श्री आशिष तांबोळी, श्री प्रशांत दर्णे,दर्णे परिवार व ग्रामस्थ उपस्थित होते