प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन असून असंख्य जण दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यात येत आहेत दरम्यान ऑल इंडिया पॅंथरचे अध्यक्ष दीपक केदार आणि त्याच्या कार्यकर्त्यांना चैत्यभूमी पुढे जाऊ न दिल्याने त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणावर भीम सैनिक एकत्र येत असतात. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्या राज्यासह देशभरातील लोकांचा समावेश असतो. यावेळी ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जास्त गर्दी न करण्याचं आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचं आवाहन मुंबई महानगर पालिकेने केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनुयायांमध्ये तणाव निर्माण झाला. यावेळी पोलीस आणि अनुयायी यांच्यात काही काळ झटापट देखील झाली.
वीर सावरकरांबद्दल जो वाद झाला तो दुर्दैवी, त्यांना मराठी माणूस विसरू शकत नाही - शरद पवार
महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मनपाकडून दरवर्षी चैत्यभूमीवर व्यवस्था करण्यात येत असते. मात्र यंदा काही व्यवस्था करण्यात न आल्याचा आरोप अनुयायांकडून केला जातो आहे. त्यामुळे देखील त्यांच्या नाराजी निर्माण झाली आहे.