पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह ...
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
कर्जत तालुक्यातील कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर असलेल्या कळंब गावातील नाक्यावर असलेल्या बाजारपेठेतील तीन दुकाने पहाटे फोडली असून त्यातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन तरुण चोरी करताना दिसून येत आहेत. दरम्यान,कळंब हा नाका सतत वाहनांच्या वर्दळीच्या असताना तेथे चोरीची घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कळंब नाक्यावर काही दुकाने असून या दुकानाच्या दोन्ही बाजूंनी कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग जात असून तेथे रात्री देखील वाहनांची वर्दळ असते. त्या भागातील सदगुरु मिडिकल,आयेशा मेडिकल आणि रविराज फोटोज अशी तीन दुकाने ११डिसेंबर रोजी पहाटेच्या वेळी फोडली.चोरट्यांनी त्यातील फोटो स्टुडिओ मधील कॅमेऱ्याच्या महागड्या लेन्स लंपास केल्या असून तेथील काही सामानाची मोडतोड केली आहे. तर सदगुरु मेडिकल स्टोर मधील पाच हजाराची रोकड आणि आयशा मेडिकल मधील चार हजाराची रक्कम लंपास केली आहे. त्यातील आयशा मेडिकल स्टोर मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन तरुण पहाटे तीन वाजून दहा मिनिटांनी दुकानात प्रवेश करीत असल्याचे स्प्ष्टपणे दिसून येत आहेत.तर दुकानातील कॅमेऱ्यात ते तरुण मोबाईलच्या बॅटरीमधून काही वस्तू शोधात असल्याचे दिसून आले आहे.
या चोरीच्या घटनेबाबत नेरळ पोलीस ठाण्यात कळंब येथील आऊट पसोट पोलीस चौकीत सदगुरु मेडिकलचे मालक महेश वासवानी,आयेशा मेडिकलचे मालक नदीम डोंगरे आणि रविराज फोटोज चे रवींद्र बदे यांनी टाकणारी नोंदविल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येत असलेले तरुण यांनी जीन्स पंत परिधान केल्या असून दोंघांनी डोक्यावर हुडी परिधान केली असून सर्वांनी तोंडावर रुमाल बांधले आहेत. त्यामुले नेरळ पोलिसांसाठी या घटना आव्हानात्मक अशाच आहेत.