मा आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांनी घेतली सदिच्छा भेट
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
उरण पोलीस ठाण्याचे रवींद्र बुधवंत साहेब यांना बढती मिळाल्याने नियंत्रण कक्षात असलेले *सुनील पाटील साहेब यांची उरण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक* म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर शुक्रवार दिनाकं 10 डिसेंबर 2021 रोजी *शिवसेना जिल्हाप्रमुख मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांनी उरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनील पाटील साहेब* याची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
या वेळी उरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते श्री गणेश शिंदे, शहर संपर्कप्रमुख श्री गणेश म्हात्रे, नगरसेवक समीर मुकरी, अतुल ठाकूर, उपशहरप्रमुख श्री गणेश पाटील, युवासेना विधानसभा अध्यक्ष श्री नितेश पाटील उपस्थित होते.