सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या कडून,भागूबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात चौथ्या कै. जनार्दन भगत स्मरणीयव्याख्यानमालेचे उद्घाटन

डॉ. शितला गावंड यांच्या पुढाकाराने ऑनलाइन पध्दतीने, झुम मिटींग आणि युट्यूबच्या माध्यमातून करण्यात आले.


प्रेस मीडिया वृत्तसेवा

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील


जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयाच्या चौथ्या कै. जनार्दन भगत स्मरणीय व्याख्यानमालेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांचे हस्तेझाले. कोव्हीड-१९ या साथीच्या आजारच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या संपूर्ण उपस्थितीतीस मज्जाव असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता, न्यायाधीश, कायदेतज्ञ आणिशिक्षण क्षेत्रातील मान्यवर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना, मिळावे यासाठी या व्याख्यानमालेचे आयोजन भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शितला गावंड यांच्या पुढाकाराने ऑनलाइन पध्दतीने, झुम मिटींग आणि युट्यूबच्या माध्यमातून करण्यात आले होते.

     सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी सदर व्याख्यनमालेचे उद्घाटन करून “चॅलेंजेस बिफोर लिगल अँड ज्युडिशियल सिस्टम ऑफ इंडिया” या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी या विषयावर बोलताना न्यायव्यवस्था बळकट करण्याबाबत सविस्तर माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना ‘न्यायाधीश पद’ या पर्यायाचा गांभीर्याने विचार करण्याचा सल्ला दिला आणि न्यायदान केल्याचे समाधान खूप मोठे असून, जर कमी वयात न्यायाधीशपदी नियुक्ती झाली तर भविष्यात मिळणारे लाभ चांगले असल्याचे सांगितले. या मालिकेतील दुसरे व्याख्यान व्याख्यान मुंबई उच्च न्यायालयातील जेष्ठ विधीज्ञ राम आपटे यांनी“करंट सिनारीओ ऑफ कॉन्स्टीटयुशनल वॅल्यूज इन इंडिया” या विषयावरदिलेआणि त्यानंतर तिसरे व्याख्यान मुंबई उच्च न्यायालयातील जेष्ठ विधीज्ञ सुदीप पासबोला यांनी“ओव्हरव्ह्यू ऑफ क्रिमिनल ट्रायल्स्” या विषयावरदिले. सर्व सन्माननीय व्यक्त्यांनी प्रत्येक व्याख्यानाच्या शेवटी प्रश्नोत्तरे सदरात विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.

या व्याख्यानमालेच्या प्रत्येक व्याख्यानास  मोठ्या संख्येने विद्यार्थी, माजी विद्यार्थी काही विधी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, तसेच अनेक वकील उपस्थित होते. ही व्याख्यानमाला यशस्वीरित्या पार पाडण्यास महाविद्यालयाच्या सहा. प्राध्यापिका  संघाप्रिया शेरे,  कृपा नाईक,  रॅव्हनिश बेक्टर, कु. भाग्यश्री पाटील,  धनश्री चौगुले, प्रियंका उंडे, ग्रंथपाल हितेश छत्तानी आणि मुटकोर्ट सचिव सुयश बारटक्के, फैजान शेख, समृद्धी टिवटणे यांचे मोलाचे योगदान लाभले.

     व्याख्यानमालेच्या शेवटी जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या सदस्या अर्चना ठाकूर यांनी समारोपाचे मनोगत व्यक्त करताना विधी महाविद्यालयात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी उपस्थिती नोंदवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यासाठी तसेच या वर्षी एलएल.एम. या अभ्यासक्रमास परवानगी मिळून, पहील्याच वर्षी सर्व जागा भरल्याबाबत महाविद्यालयाचे अभिनंदन केले. त्यांनी या व्याख्यानमालेत विद्यार्थ्याना मार्गदर्शन केल्याबद्दल सर्व वक्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.व्याख्यानमालेच्या शेवटी विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. शितला गावंड यांनीआभार प्रदर्शनात व्याख्यानमालेत उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख पाहुण्याचे आभार मानले आणि त्याचबरोबर वेळोवेळी मिळणारे योग्य मार्गदर्शन आणि पाठींबा यासाठी संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, अध्यक्ष अरुणशेठ भगत साहेब, व्हाईस चेअरमन श्री. वाय. टी. देशमूख साहेब आणि संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सर्व सदस्य यांचे आणि महाविद्यालयाचा कर्मचारी वृंद आणि सर्व विद्यार्थी यांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post